Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दूध बंद आंदोलन सुरु

दूध बंद आंदोलन सुरु
, सोमवार, 16 जुलै 2018 (10:25 IST)
राज्यातील शेकर्‍यांना दूध उत्पादनाचा खर्च परवडत नाही. सरकारने शेतकर्‍यांना प्रतिलिटर पाच रुपये दरवाढ द्यावी यासाठी रविवारी मध्यरात्रीपासून दूध बंद आंदोलनाची सुरुवात झाली आहे. सरकारने शेतकर्‍यांच्या सहनशीलतेचा सरकाने अंत पाहू नये. आंदोलन दडपण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
 
राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे. खा. राजू शेट्टी यांनी रविवारी रात्री बारानंतर पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर आंदोलन केले. ठिकठिकाणी ग्रामदैवतांना अभिषेककरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली. त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंबेगाव (पुणे) येथील गोवर्धन दूध संघाचा दूध वाहतूक करणारा टॅँकर फोडून दूध रस्त्यावर सोडून दिले. 
 
दुसरीकडे  काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ केली आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रेल्वेतही शॉपिंग करा, पहील्यांदाच प्रयोग