राजस्थान सरकार ने रेशनकार्ड धारकांसाठी मोठी घोषणा केली. उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना आणि राज्यातील दारिद्र्यरेषेखालील वर्गातील लोकांना सरकार 500 रुपयांना गॅस सिलिंडर देणार असल्याची घोषणा त्यांनी केली. 1 एप्रिल 2023 पासून या दोन्ही श्रेणीतील कुटुंबांना निम्म्यापेक्षा कमी किमतीत गॅस सिलिंडर मिळण्यास सुरुवात होईल. एका कुटुंबाला वर्षभरात 12 सिलिंडर दिले जातील
राज्यातील सुमारे 75 लाख कुटुंबांना 500 रुपयांना गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे.
सध्या राजस्थानमध्ये एक गॅस सिलिंडर सुमारे 1000 रुपयांना मिळतो. उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडर घेणार्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून 200 रुपये अनुदान मिळते. अशा परिस्थितीत त्यांना 850 रुपयांच्या जवळपास सिलेंडर मिळतो
केंद्र आणि राज्य सरकार महागाईचा भार सामान्य माणसांवर कमी करण्यासाठी पुढील अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद करणार. त्यानंतर 1 एप्रिल 2023 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.