आता दहा रुपयाची नवी नोट बाजारात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बँक लवकरच दहाची नवी नोट जारी करणार आहे. महात्मा गांधी सीरिजमधील नवी नोट तपकिरी रंगाची असेल. आरबीआयने 10 रुपयांच्या कोट्यवधी नोटांची छपाई सुरुही केली आहे.
गेल्याच आठवड्यात या नोटेचं डिझाईन निश्चित झालं होतं. त्यानंतर आता तिची छपाईही सुरु झाली आहे. यापूर्वी 2005 मध्ये दहाच्या नोटेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास 13 वर्षांनी पुन्हा या नोटेची रचना बदलण्यात येत आहे. नवी दहाची नोट तपकिरी रंगाची असून नोटेवर कोणार्क सूर्य मंदिराचं चित्र असणार आहे.