लाल मिरच्यांच्या दरांमध्ये जबर वाढ व्हायला लागली आहे. बांगलादेश, फिलिपाईन्स, थायलंड या देशातून अचानक मिरचीला मागणी वाढल्याने प्रतिकिलोचे दर मंगळवारी १४० ते १६० रुपयांवर जाऊन पोहोचले. परिणामी, मिरचीच्या देशांतर्गत दरात वाढ झाली आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले.
आंध्र प्रदेशातील गुंटूर मिरचीच्या बाजारात नवीन लाल मिरचीचे दर कमी झाले होते. करोनामुळे चीनमधून गुंटूर मिरचीला मागणी कमी झाली. मात्र, अन्य देशांतील वाढत्या मागणीमुळे लाल मिरचीचे दर वाढले आहेत. तेजा मिरचीचे दरही कमी झाले होते. मात्र परदेशातील मागणीमुळे तेजा मिरचीच्या दरात टप्याटप्याने वाढ झाल्याची माहिती दी फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ ट्रेडर्सचे (फॅम) पदाधिकारी आणि मिरचीचे मार्केट यार्डातील व्यापारी वालचंद संचेती यांनी सांगितले. गेल्या हंगामात फेब्रुवारी महिन्यात तेजा मिरचीची विक्री घाऊक बाजारात प्रतिकिलो ८५ ते ८८ रुपये या दराने केली जात होती. यंदा या मिरचीचे दर १२० ते १३० रुपयांपर्यंत आहेत. सीड व्हरायटी लाल मिरचीची खरेदी मसाला उत्पादक करतात. पूर्वी लाल मिरचीचे दर वाढण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागायचा. यंदा मात्र मिरची बाजारात मोठी उलाढाल होत असल्याचे निरीक्षण संचेती यांनी नोंदविले.