गृह मंत्रालयाने इन्फोसिस फाऊंडेशनचे रजिस्ट्रेशन रद्द केले आहे. परदेशातून निधी स्विकारल्याप्रकरणी ही कारवाई झाली आहे. इन्फोसिस फाऊंडेशनवर परदेशी निधी स्विकारताना कायद्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
इन्फोसिस फाऊंडेशनला याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले, “आम्ही स्वतः गृहमंत्रालयाकडे परदेशी निधी नियंत्रण कायद्यानुसार (एफसीआरए) संस्थेचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी अर्ज केला होता. त्यानंतरच गृहमंत्रालयाने ही कारवाई केली. 1996 पासून शिक्षा, ग्रामीण विकास, आरोग्य सेवा, कला आणि संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये इन्फोसिस फाऊंडेशन काम करत आहे. इन्फोसिसचे संस्थापक आणि चेयरमॅन एन. आर. नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मुर्ती संस्थेच्या अध्यक्ष आहेत.