Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Reliance Jio ने दोन स्वस्त प्लॅन केले बंद करून युजर्सना झटका

webdunia
मंगळवार, 21 जुलै 2020 (11:04 IST)
आघाडीची टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या JioPhone युजर्सना झटका दिला आहे. या वर्षाच्या सुरूवातीला JioPhone युजर्ससाठी आणलेले दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन (Jio Reacharge Plan discontinues) कंपनीने बंद केले आहेत.
 
कोणते प्लॅन केले बंद?:-
फेब्रुवारी महिन्यात JioPhone युजर्ससाठी कंपनीने 49 रुपये आणि 69 रुपयांचे हे दोन स्वस्त प्लॅन आणले होते. पण आता हे दोन्ही प्लॅन कंपनीने बंद केले आहेत. या दोन्ही प्लॅनमध्ये युजर्सना 14 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. याशिवाय दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या सेवा वेगवेगळ्या होत्या. 49 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 2 जीबी डेटा, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 SMS मिळायचे. तर, 69 रुपयांच्या प्लॅनमध्ये जियो टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, एकूण 7GB डेटा, अन्य नेटवर्कसाठी 250 नॉन-जिओ मिनिटे आणि 25 SMS मिळायचे. याशिवाय दोन्ही प्लॅन्समध्ये जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शन दिलं जात होतं.
 
पर्याय काय?:- (Jio Reacharge Plan discontinues)
आता हे दोन प्लॅन बंद झाल्याने जिओफोन युजर्ससाठी 75 रुपयांचा रिचार्ज प्लॅन सर्वात स्वस्त प्लॅन असणार आहे. या प्लॅनमध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि दररोज 0.1GB डेटा मिळतो, म्हणजे एकूण 3 जीबी डेटा युजर्सना मिळतो. तसेच, जिओ टू जिओ अनलिमिटेड कॉलिंग, अन्य नेटवर्कसाठी 500 नॉन-जिओ मिनिटे आणि 50 SMS मिळतात. याशिवाय जिओ अॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही युजर्सना मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia Hindi

पुढील लेख

सीसीडीने सुमारे २८० आऊटलेट्स बंद केली