रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) ने आपल्या नवीन मुख्य वित्तीय अधिकाऱ्याचे (CFO) नाव जाहीर केले आहे. मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील RIL ने सांगितले की वेंकतारी श्रीकांत यांची कंपनीचे नवीन CFO म्हणून निवड झाली आहे. सध्याचे सीएफओ आलोक अग्रवाल यांच्या जागी श्रीकांत आले आहेत.
नवनियुक्त CFO वेंकतारी श्रीकांत यांची नियुक्ती 1 जून 2023 पासून लागू होईल. त्यानंतर आलोक अग्रवाल रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांच्या वर वरिष्ठ सल्लागाराची जबाबदारी देण्यात आली आहे.
कंपनीने सांगितले की, सध्याचे CEOआलोक अग्रवाल हे 30 वर्षांपासून आरआयएलशी संबंधित आहेत आणि सध्या ते 65 वर्षांचे आहेत.अग्रवाल 1993 मध्ये रिलायन्समध्ये रुजू झाले. 2005 मध्ये कंपनीच्या CFO च्या भूमिकेत आले. अग्रवाल यांनी गेल्या 30 वर्षांत रिलायन्सच्या बहुआयामी वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.त्याच्या देखरेखीखाली, कंपनीचा महसूल जवळपास 240 पट वाढला. सध्याचे CFO अग्रवाल हे एक कुशल वित्त व्यावसायिक आहेत .अग्रवाल यांनी गेल्या काही वर्षांत रिलायन्समधील भारतातील सर्वात मोठ्या कॉर्पोरेट ट्रेझरी ऑपरेशन्सपैकी एक यशस्वीरित्या व्यवस्थापित केले.
रिलायन्स ही FY22 मध्ये वार्षिक उलाढाल $100 अब्ज पार करणारी पहिली भारतीय कंपनी बनली आहे आणि तिने FY23 च्या पहिल्या 9 महिन्यांत $90 बिलियनची कमाई केली आहे .