Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा
मुंबई , गुरूवार, 18 ऑक्टोबर 2018 (10:21 IST)
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात मोठी निजी कंपनी रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने चालू वित्त वर्षाच्या दुसर्‍या त्रैमासिकात 9516 कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला आहे, जो मागील वित्त वर्षाच्या या काळाच्या 8109 कोटी रुपयांच्या फायद्याच्या तुलनेत 17.5 टक्के जास्त आहे.
 
कंपनीच्या निदेशक मंडळाच्या बैठकीनंतर अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी बुधवारी येथे घोषणा करत म्हटले की 30 सप्टेंबर रोजी समाप्त या तिमाहीत कंपनीचा एकूण व्यवसाय 54.5 टक्के वाढून 156291 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वित्त वर्ष 2017-18 च्या दुसर्‍या तिमाहीत हे 101169 कोटी रुपये होते. या दरम्यान रिलांयस इंडस्ट्रीजचा एकलं व्यवसाय 37.1 टक्के वाढून 103086 कोटी रुपये राहिला व नफा 7.2 टक्के वाढून 8859 कोटी रुपये राहिला.
 
जियोला 681 कोटींचा लाभ : अंबानीने आपली दूरसंचार कंपनी रिलायंस जियोच्या प्रदर्शनाचे उल्लेख करत म्हटले की दुसर्‍या तिमाहीत जियोने 681 कोटी रुपये शुद्ध लाभ मिळवला आहे. या तिमाहीत प्रथमच कंपनीने 10 हजार कोटी राजस्वच्या स्तराला पार केले आहे. 30 सप्टेंबर रोजी समाप्त तिमाहीत कंपनीच्या ग्राहकांची संख्या वाढून 25 कोटींच्या वर पोहोचली आहे.
 
त्यांनी सांगितले की अर्थव्यवस्थेच्या स्तरावर आव्हान असले तरी त्यांच्या कंपनीने शानदार प्रदर्शन केले आणि पेट्रोलियम तथा तेल शोधन व्यवसायात अशा वेळेस रोख प्रवाह वाढवण्यात मदत केली आहे, जेव्हा भारतीय मुद्रा आणि कमोडिटी बाजारात चढ उतार होत आहे. अंबानी यांनी सांगितले की जियोचा प्रति ग्राहक औसत राजस्व देखील या त्रैमासिकात 131.70 रुपयांवर पोहोचला आहे. या तिमाहीत त्याच्या ग्राहकांनी 771 कोटी जीबी डाटाचा वापर केला आहे. त्यांनी सांगितले की मार्च 2018 मध्ये रिलायंस इंडस्ट्रीजवर ऐकून 218763 कोटी रुपयांचे कर्ज होते जे सप्टेंबरमध्ये वाढून 258701 कोटींवर पोहोचले आहे.
 
डेन आणि हैथवेमध्ये रणनीतिक निवेश : रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडने डेन नेटवर्क्स लिमिटेड आणि हैथवे केबल एंड डाटाकॉम लिमिटेडमध्ये रणनीतिक निवेश आणि भागीदारीची घोषणा केली आहे. हैथवे केबल एंड डाटाकॉम लिमिटेडमध्ये 51.3% भागादारीसाठी, प्रीफ्रेंशियल इश्यूच्या माध्यमाने 2,940 कोटी रुपयांचे प्रायमरी निवेश करण्यात येईल.
 
सेबी अधिग्रहण विनियमांच्या माध्यमाने आवश्यकतेनुसार डेन आणि हैथवेसोबत जीटीपीएल हैथवे लिमिटेड आणि हैथवे भवानी केबलटेल एंड डाटाकॉम लिमिटेडसाठी देखील ओपन ऑफर आणेल. ही रणनीतिक निवेश रिलायंसच्या त्या मिशनचा भाग आहे, ज्याचा उद्देश्य आहे प्रत्येकाला, जोडण्याला प्रत्येक वस्तूला आणि प्रत्येक जागेला कनेक्ट करणे, तसेच उच्चतम गुणवत्ता आणि कमी मूल्यावर भारताचे डिजीटल परिदृश्याला बदलणे.
 
ब्रॉडबँड स्पेसमध्ये भारताला शीर्ष जागेवर पोहोचवल्यानंतर, रिलायंस आता वायरलाइन डिजीटल कनेक्टिविटीमध्ये भारताला 135व्या जागेवरून जगातील शीर्ष 3 देशांमध्ये सामील करवण्यासाठी प्रतिबद्ध आहे. यासाठी 1100 शहरांमध्ये 5 कोटी घरांमध्ये JioGigaFiber रोलआउटमध्ये तेजी आणण्याचा सौदा केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर