फोटो साभार -सोशल मीडिया सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव चीन मध्ये वाढल्यामुळे लॉक डाऊन करण्यात आले आहे. चीनच्या काही शहरातच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहे. सध्या चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे होणाऱ्या परिणामाचा दुष्प्रभाव भारतात छत्री व्यवसायांवर देखील झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतात बनणाऱ्या छत्र्या महागल्यामुळे लोक चिनी छत्री घेतात.चिनी छत्र्यांची मागणी मोठ्या प्रमाणात होतं असल्यामुळे व्यावसायिक मोठ्या प्रमाणात चिनी छत्र्यांची आयात करत होते. तर काही भारतीय कारखानदार चीनमधून कच्चा माल स्वस्तात आणून भारतात छत्र्या तयार करून विकायचे.
सध्या चीनमधून छत्र्यांच्या निर्मितीसाठी लागणार कच्चा माल महागला आहे. यामुळे बाजारातील चिनी छत्र्यांच्या किमती वाढल्या आहेत. सध्या फोल्डिंग छत्रीला जास्त मागणी आहे. पूर्वी 90 ते 100 रुपयांत मिळणाऱ्या छत्र्या 150 रुपयांनी मिळत आहे.