केरळमध्ये आलेल्या पूराने जनजीवन प्रचंड विस्कळीत झाले आहे. आता स्टेट बँक ऑफ इंडिया अर्थातच एसबीआयनेही या पूरग्रस्तांना मोठी मदत केली आहे. एसबीआयने पूरग्रस्तांना मदत म्हणून तब्बल दोन कोटी रूपयांचा मदतनिधी देण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, एसबीआयने पूरग्रस्तांसाठी इतरही अनेक सुविधा देऊ केल्या आहेत.
एसबीआयने देऊ केलेल्या सुविधा
-
मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत पाठवल्यास कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. जर शुल्क आकारण्यात आले तर, ते माफ केले जाईल.
-
ग्राहकांच्या खात्यात मुलभूत रक्कम ठेवण्याची अटही काढण्यात आली. त्या खातेधारकांना लागलेला दंडही माफ केला जाणार.
-
ग्राहकांच्या क्रेडीट कार्ड्सची सेवा एक महिन्यांनी वाढवली.
-
राज्यात जागोजागी पॉईंट ऑफ सेल (PoS) बनविण्यात आले आहेत. ज्यामुळे कमीत कमी २००० रूपये ग्राहकाला खात्यावरून काढता येऊ शकतात.
-
ज्या ग्राहकांची व्यक्तीगत कागदपत्रे गहाळ, किंवा हरवली आहेत त्यांचे फोटो आणि स्वाक्षरी किंवा आंगठ्याची निशाणी घेऊन खाते उघडले जाईल.