स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ पतियाळा आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद या भारतीय स्टेट बँकेच्या (एसबीआय) पाच सहयोगी बँकांचं एसबीआयमध्ये विलिनीकरण 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे.
एसबीआयने ही माहिती दिली आहे. या विलिनीकरणामुळे एसबीआयची मालमत्ता 37 लाख कोटी रुपये होईल. तिच्या 22 हजार 500 शाखा आणि 58 हजार एटीएम होतील, तसेच एसबीआयचे ग्राहक वाढून 50 कोटींहून अधिक होतील. विलिनीकरणासाठी केंद्र सरकारनेही अधिसूचना जारी केली आहे. विलिनीकरणानंतर बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर काहीही फरक पडता कामा नये, असं केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केलं आहे. एसबीआय 16 हजार शाखांसह देशातील नंबर एकची बँक असली तरीही जगातील मोठ्या 50 बँकांमध्ये एसबीआयचा अजून सहभाग झालेला नाही. यामध्ये एसबीआय 67 व्या स्थानी आहे.