स्टेट बॅंक ऑफ इंडियाने खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे. बॅंकेकडून या चार्जमध्ये ७५ टक्के कपात करण्यात आली आहे. नवीन दर १ एप्रिल २०१८ पासून लागू होतील. या नव्या नियमानुसार कोणत्याही खातेदाराला १५ रूपयांपेक्षा जास्त दंड द्यावा लागणार नाही. ही रक्कम आत्तापर्यंत ५० रूपये इतकी होती.
मेट्रो आणि शहरी परीसरात मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास चार्ज ५० रूपयांवरून १५ रूपये केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आलाय. त्याचप्रमाणे ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल. बॅंकेच्या या निर्णयामुळे २५ कोटी खातेदारांना फायदा होणार आहे. सध्या एसबीआयमध्ये जवळपास ४१ कोटी बचत खाती आहेत. त्यातील १ कोटी खाती पंतप्रधान जनधन योजने अंतर्गत आहेत.