भारतीय शेअर बाजार सुरू होताच मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सक्सने ३८,४८७ अंशांची पातळी गाठली. तर निफ्टीने ऐतिहासिक ११,६०० अंशाचा टप्पा पार केला. शेअर बाजारातील इतिहासात निफ्टीने विक्रमी उसळी घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. यामुळे शेअर बाजार उसळी घेत असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळत आहे.
आयटीसी, एचडीएफसी, ॲक्सिस बँक आदींचे शेअर्स तेजीत आहेत. दरम्यान, भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतली असली तरी आशियातील शेअर बाजारात घसरण दिसून आली. अमेरिकेने चीनमधील १६ अब्ज डॉलर वस्तूंवर आयात शुल्क लागू केल्याचा परिणाम आशियाई बाजारावर झाला आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे.