Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पेट्रोल, डिझल दराची माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था

पेट्रोल, डिझल दराची माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था
, मंगळवार, 13 जून 2017 (12:37 IST)
येत्या 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज ठरणार आहेत. या पार्श्वभूमीवर ग्राहकांना पेट्रोल आणि डिझलच्या रोजच्या दराविषयी माहिती देण्यासाठी तेल कंपन्यांनी विशेष व्यवस्था केली आहे. 
इंडियन ऑईलच्या पेट्रोल पंपावरील दर
 
- तुम्ही www.iocl.com या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेऊ शकता.
- Fuel@IOC हे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही जवळपासच्या पेट्रोल पंपावरील दर समजतील.
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.
 
भारत पेट्रोलि‍यम’च्या पेट्रोल पंपावरील दर 
www.bharatpetroleum.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही पेट्रोल-डिझेलच्या दराची माहिती मिळेल.
- मोबाइलवर SmartDrive हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर किंमतीची माहिती मिळेल. 
- मोबाईलवर RSPDealer Code टाईप करून ९२२३११२२२२ या क्रमांकावर SMS पाठवावा. पण, यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर लिहलेला डिलर कोड माहिती असणं आवश्यक आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सानियाचा फोटो शेअर करून रामूने ओढवला वाद