केंद्र सरकारने कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे 5 लाख टन कच्ची साखर आयात केली जाणार आहे. या निर्णयामुळे साखरेचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आपल्या देशात साखरेचे उत्पादन अंदाजे 2 कोटी टन झाले आहे. मात्र देशाला अधिक साखर हवी आहे त्यामुळे आयात करणे गरजेचे आहे. भारतीय साखर महासंघाच्या यंदा भारतात 2 कोटी 3 लाख टन साखरेचे उत्पादन होईल. मात्र भारताची साखरेची गरज ही 2 कोटी 40 लाख टन इतकी आहे. त्यामुळे ही वाढीव गरज भागवण्यासाठी आता साखर आयात केली जाणार आहे. तर साखर गाळप आता ऑक्टोबर मध्ये सुरु होईल तो पर्यंत जर साखर नसली तर देशात दर वाढतील त्यामुळे कोणतेही दर वाढू नये या करिता केंद्राने आयात धोरण ठेवले असून जून महिन्या पर्यंत सूट दिली आहे.