Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

असा आहे रविवारचा मेगा ब्लॉक

असा आहे रविवारचा मेगा ब्लॉक
, शुक्रवार, 23 एप्रिल 2021 (22:35 IST)
मध्य रेल्वे, मुंबई विभाग रविवार दि. २५.४.२०२१ रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी आपल्या उपनगरी भागांवर मेगा ब्लॉक परिचालीत करणार आहे.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व विद्याविहार दरम्यान अप व डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी  ३.५५ पर्यंत या वेळेत मेगाब्लॉक असणार आहे. 
 
सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणा-या धिम्या सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविण्यात येतील  तसेच या सेवा मशिद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड, आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार  नाहीत व त्यानंतर नियोजित मार्गावर पुन्हा वळविण्यात येतील.
 
घाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत  सुटणा-या अप- धिम्या मार्गावरील रेल्वे सेवा  विद्याविहार व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत तसेच या सेवा विद्याविहार, करी रोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशिद या स्थानकांवर थांबणार  नाहीत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

साधेपणाने आपापल्या घरी हनुमान जयंती उत्सव साजरा करा