Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरपदी टी. राबी शंकर

रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरपदी टी. राबी शंकर
नवी दिल्ली , सोमवार, 3 मे 2021 (08:43 IST)
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीने रिझर्व्ह बँकेच्या उपगव्हर्नरपदी टी. राबी शंकर यांची नियुक्ती केली आहे. शंकर हे यापूर्वी आरबीआय मध्येच कार्यकारी संचालक (पेमेंट्‌स अँड सेटलमेंट) म्हणून काम पाहत होते.
 
तीन वर्षांच्या कालावधीसाठी शंकर यांची उपगव्हर्नर म्हणून नियुक्ती झाली आहे. बी. पी. कानूनगो हे आरबीआयच्या उपगव्हर्नर पदावरून गेल्या महिन्यात निवृत्त झाले होते. त्यांच्या जागी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. आरबीआममध्ये सध्या महेशकुमार जैन, मायकल पत्रा आणि ए. राजेश्र्वर राव हे तीन उपगव्हर्नर कार्यरत आहेत. चौथे उपगव्हर्नर म्हणून शंकर सूत्रे सांभाळतील. शंकर यांनी आरबीआयमध्ये आतापर्यंत अनेक महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यात एक्सेंज रेंट व्यवस्थापन, राखीव निधी व्यवस्थापन, सरकारी कर्ज व्यवस्थापन, मॉनेटरी ऑपरेशन्स, वित्तीय बाजाराचे नियमन, देखरेख आणि पेमेंट सिस्टीस, आयटी इन्फ्रास्ट्रक्चर आदी जबाबदार्यांाचा समावेश आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिल्लीचा पंजाबवर 7 गडी राखून विजय