Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कंपोजिट स्मार्ट गॅस सिलिंडर घ्या पैसे वाचवा

कंपोजिट स्मार्ट गॅस सिलिंडर घ्या पैसे वाचवा
, बुधवार, 16 मार्च 2022 (15:02 IST)
कंपोझिट सिलिंडर म्हणजे काय: सामान्यतः लोकांना त्यांच्या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे याची कल्पना नसते. अनेक वेळा गॅस संपला समजून नवीन सिलिंडर  बसवला जातो. मात्र, कंपोझिट सिलिंडरच्या बाबतीत असे होत नाही. हा सिलिंडर तीन वेगवेगळ्या थरांमध्ये आहे. या मुळे या सिलिंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे हे बघता येईल. अनेक वेळा वितरक कमी वजन असलेला एलपीजी सिलिंडर देतात, अशा लोकांची चोरीही तुम्ही पकडू शकता. याशिवाय एलपीजीची स्थिती पाहून तुम्ही नवीन सिलिंडर बुक करू शकता.
 
या सिलिंडरचे वैशिष्ट्य आहे: की सध्याच्या गॅस सिलिंडरच्या तुलनेत त्याचे वजन अर्धे आहे. तसेच तुम्ही जेथे कंपोझिट सिलिंडर ठेवता तेथे तुम्ही कोणत्याही प्रकारचे डाग पडत  नाही. त्याची उत्कृष्ट रचना या सिलिंडरला आकर्षक बनवते. 
 
कोणत्या शहरांमध्ये उपलब्ध आहे-  सध्या देशातील 28 शहरांमध्ये कंपोझिट सिलिंडर उपलब्ध आहे. यामध्ये अहमदाबाद, अजमेर, अलाहाबाद, बंगळुरू, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, कोईम्बतूर, दार्जिलिंग, दिल्ली, फरिदाबाद, गुडगाव, हैदराबाद, जयपूर, जालंधर, जमशेदपूर, लुधियाना, म्हैसूर यांचा समावेश आहे. या शहरांमध्ये निवडक वितरकांकडे कंपोझिट सिलिंडर उपलब्ध आहे. याशिवाय पाटणा, रायपूर, रांची, संगरूर, सुरत, तिरुचिरापल्ली, तिरुवल्लूर, तुमकूर, वाराणसी आणि विशाखापट्टणम येथेही कंपोझीट सिलिंडर उपलब्ध आहे.  
हे सिलिंडर 5 किलो आणि 10 किलो आकाराचे असतील.
10 किलोच्या सिलिंडर साठी सुरक्षा ठेव 3350 रुपये आहे आणि
 5 किलो च्या सिलिंडर साठी सुरक्षा ठेव  2150 रुपये निश्चित करण्यात आली आहे.
आपण  सध्याचे असलेले सिलिंडर देखील यासह बदलू शकता.
या सिलिंडरची होम डिलिव्हरीही केली जाते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पोलिसांच्या अब्रुची लक्तरं वेशीवर, पोलीस चौकीतच मद्य पार्टी