Publish Date: Sat, 05 Nov 2016 (10:07 IST)
Updated Date: Sat, 05 Nov 2016 (10:10 IST)
सध्या हाकलून दिलेले टाटाचे अध्यक्ष सायरस मिस्त्री चर्चेत आहेत. तर रतन टाटा यांच्या वादामुळं बॉम्बे हाऊस सध्या केंद्रस्थानी आहे. मुंबईतील बॉम्बे हाऊसबाहेर वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या मिड डेचे फोटोग्राफर अतुल कांबळे, टाईम्स ऑफ इंडियाचे शांतकुमार आणि हिंदुस्थान टाईम्सचे हरजित सिंग यांचा सुरक्षा रक्षकांशी वाद झाला होता.
तेव्हा तोल गेलेल्या सुरक्षा रक्षकांनी तिघांनाही बेदम मारहाण केली होती. त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या संपूर्ण प्रकरणावर टाटा समूहाकडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.