Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Tata Motorsची नवीन SUV 300 किमी मायलेज देईल, जाणून घ्या केव्हा होईल लाँच

Tata Motorsची नवीन SUV 300 किमी मायलेज देईल, जाणून घ्या केव्हा होईल लाँच
, शनिवार, 19 ऑक्टोबर 2019 (13:19 IST)
भारतातील इलेक्ट्रिक कारचा बाजार आता तापू लागला आहे, देशात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. Hyundai Kona बाजारात आली होती, तर नुकतीच Tata Motorsने पूर्वीपेक्षा अधिक सुधारणा करून आपले नवीन टिगोर बाजारात आणले. आणि आता कंपनी आपल्या लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे इलेक्ट्रिक मॉडेल सादर करणार आहे.
 
न्यू Nexon 300 किमी मायलेज देईल
टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रिक नेक्सनमध्ये Ziptron तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. कंपनीचा असा दावा आहे की एमजी हेक्टर, किआ सेल्टोस आणि व्हिन्यूप्रमाणेच Nexon EV देखील कनेक्टिव्ह कार असेल आणि त्यामध्ये 30 हून अधिक स्मार्ट फीचर्स असतील ज्या वापरकर्त्याच्या गरजा पूर्ण करतील.
 
किंमत काय असेल?
असा विश्वास आहे की कंपनी Nexon EVला भारतात 15 ते 17 लाख रुपयांमध्ये लाँच करू शकते. Nexon EV महिंद्रा एक्सयूव्ही 300 इलेक्ट्रिकशीही स्पर्धा करते, जी पुढच्या वर्षाच्या मध्यभागी लाँच केली जाईल. Nexon EV पुढच्या वर्षाच्या सुरुवातीत येऊ शकते.
 
60 मिनिटांतच बॅटरी होईल 80 टक्के चार्ज 
याशिवाय, खास गोष्ट अशी असेल की Nexon EV ला चार्जिंगसाठी काही तासांची प्रतीक्षा करावी लागणार नाही कारण वेगवान चार्जर केवळ 60 मिनिटांत 80 टक्के पर्यंत चार्ज करण्यात येईल. कंपनीने कारची बॅटरीला 10 लाख किमीपेक्षा अधिक चाचणी केली असून कंपनी त्यावर आठ वर्षाची वॉरंटीही देईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आज प्रचाराचा शेवटचा दिवस