तामिळनाडूतील मदुराई येथे आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात १०० किलोग्रॅम सोन्याची बिस्किटे आणि १६३ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. मदुराई येथील एका बांधकाम व्यावसायिक कंपनीवर टाकण्यात आलेल्या छाप्यात ही एवढी संपत्ती सापडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, मदुराईमधील एसपीके या बांधकाम कंपनीच्या कार्यालय आणि इतर अशा मिळून २२ ठिकाणांवर आयकर विभागाने छापा मारला होता. एसपीके कंपनी सरकारमार्फत बांधल्या जाणाऱ्या महामार्गाच्या कामाचा ठेका घेतला जातो. या कंपनीच्या अरुप्नुकोटाई, वेल्लोर आणि चेन्नई येथील कार्यालयांवर काल छापा मारण्यात आला. अजूही काही कार्यालयांवर छापा टाकण्यात येणार असून यामध्ये आणखी संपत्ती हाती लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.