रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून वाढत्या महागाईमुळे रेपो रेटमध्ये वाढ करण्यात आली आहे. रेपो रेटमध्ये पाव टक्क्याने वाढ करण्यात आली आहे. रेपोरेटमध्ये वाढ झाल्याने कर्जदारांना याचा फटका बसण्याची चिन्हे आहेत. गृह, वाहन तसेच वैयक्तिक कर्ज महागण्याची शक्यता आहे. या वाढीनंतर रेपो दर ६.५० टक्के इतका झाला आहे.
यापूर्वीच्या पतधोरणात जूनमध्ये मध्यवर्ती बँकेने पाव टक्का रेपो दर वाढवित ६.२५ टक्के केला होता. तर रिव्हर्स रेपो रेटही ६.२५ टक्के इतका करण्यात आला आहे.
भारतीय बँका ज्या दरानं रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेतात त्याला रेपो रेट म्हणतात. तर भारतीय बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ठेवी ठेवल्यास त्यांना रिझर्व्ह बँकेकडून जो व्याजदर मिळतो त्याला रिव्हर्स रेपो रेट म्हणतात.