Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Parle G ची किंमत वाढणार, पॅकेटची किंमत बदलणार नाही, वजन कमी होईल

Parle G ची किंमत वाढणार, पॅकेटची किंमत बदलणार नाही, वजन कमी होईल
, बुधवार, 24 नोव्हेंबर 2021 (12:10 IST)
उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे प्रमुख खाद्य कंपनी पार्ले प्रॉडक्ट्सने त्यांच्या सर्व श्रेणीतील उत्पादनांच्या किमतीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ केली आहे. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. ते म्हणाले की, साखर, गहू आणि खाद्यतेलासारख्या कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपनीला आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवाव्या लागल्या आहेत.
 
किंमती 10 टक्क्यांपर्यंत वाढ
कंपनीचे सर्वात लोकप्रिय ग्लुकोज बिस्किट पार्ले जी आता 6-7 टक्के महाग झाले आहे. यासह, कंपनीने रस्क आणि केक विभागात अनुक्रमे 5-10 टक्के आणि 7-8 टक्क्यांनी किमती वाढवल्या आहेत. पार्लेच्या बिस्किट विभागातील उत्पादनांमध्ये Parle G, Hide & Seek आणि Crackjack या लोकप्रिय ब्रँडचा समावेश आहे.
 
पॅकेटची किंमत बदलणार नाही, वजन कमी होईल
पार्ले प्रॉडक्ट्सचे वरिष्ठ श्रेणी प्रमुख मयंक शाह म्हणाले, “आम्ही किमती 5-10 टक्क्यांनी वाढवल्या आहेत.” त्याच वेळी, किमती आकर्षक पातळीवर ठेवण्यासाठी, पॅकेटच्या 'ग्रॅम्स' अर्थात वजनात कपात करण्यात आली आहे.
 
पार्लेने उत्पादनांच्या किमती का वाढवल्या?
ते म्हणाले की "आपल्याला तोंड द्यावे लागत असलेल्या उत्पादन खर्चावरील महागाईचा दबाव लक्षात घेऊन हे केले गेले आहे. बहुतेक कंपन्यांना याचा सामना करावा लागत आहे,". खाद्यतेलासारख्या निविष्ठ सामग्रीच्या किमती गेल्या वर्षीच्या तुलनेत 50-60 टक्क्यांनी वाढल्याने कंपनीला महागाईच्या दबावाचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
या आर्थिक वर्षातील पहिली दरवाढ
या आर्थिक वर्षात पार्लेने केलेली ही पहिली वाढ आहे. यापूर्वी, कंपनीने जानेवारी-मार्च 2021 च्या तिमाहीत किमती वाढवल्या होत्या, परंतु ते 2020-2021 या आर्थिक वर्षात करण्यात आले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गौतम गंभीरचा आरोप, 'इसिस काश्मीर'कडून जीवे मारण्याच्या धमक्या