मागील काही आठवडे आंतरराष्ट्रीय बाजाराच्या परिणामामुळे संथ झालेल्या शेअर बाजाराने चांगली उसळी घतेली आहे. शेअर बाजारात मोठा उत्साह दिसून आला असून, बाजार ३२४ अंकांनी वधारून ३६५९८वर पोहोचला आहे. जर ही वाढ आणि स्थिती कायम राहिली तर शेअर बाजार ३७ हजाराचा पल्ला गाठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर निफ्टीतही सुधारणा पाहायला मिळाली आहे. निफ्टी ८८.५५ अंकांनी वाढून ११,०३६ वर पोहोचला आहे. यामुळे देशातील अर्थकारणाला मोठा दिलासा मिळाला आहे. यातून ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना तर फायदा होणारच आहे, सोबतच परकीय गुंतवणूकदार देखील आपल्या देशात अधिकचा पैसा गुंतवू शकतील.