Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

टोमॅटो दोन रुपये किलो

टोमॅटो दोन रुपये किलो
राज्यात सध्या टोमॅटो दोन रुपये किलोने विकले जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यानी टोमॅटो रस्त्यावर फेकून दिले आहेत. शहरालगत असलेल्या रस्त्यावर टोमॅटो ढीग पडलेले दिसत आहे. टोमॅटोला भाव मिळत नसल्यामुळे शेतकरी मात्र संकटात सापडला आहे.
 
यंदाच्या हंगामात उत्तर महराष्ट्रात टोमॅटोचे चांगले उत्पादन निघाले आहे. हा टोमॅटो विदेशात देखील पाठवला जातो. मात्र देशात सुरु असलेया नोट बंदीमुळे व्यवहार करतांना शेतकऱ्याना अनेक अडचणी जाणवत आहेत. याशिवाय पाकिस्तानातमध्ये मोठ्याप्रमाणात टोमॅटो निर्यात केला जातो. मात्र बदलत्या भारत पाक संबंधामुळे निर्यात संपूर्णपणे बंद आहे. दुसरीकडे शेतकऱ्याला टोमॅटो पिकवण्यासाठी प्रति एकरी दीड ते दोन लाख रुपये खर्च होत असतो. मात्र आजच्या बाजारभावानुसार टोमॅटोच्या विक्रीनंतर खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोनम गुप्ता मी नाही तर तू बेवफा त्याला चांगलेच तुडवले