टोयोटा इंडियाच्या वाहनांची या सणासुदीच्या मोसमात प्रचंड विक्री झाली. टोयोटाने ऑक्टोबर 2020 मध्ये 12,373 युनिटची विक्री केली. तर ऑक्टोबर 2019 मध्ये कंपनीने एकूण 11,866 कारची विक्री केली. त्याचबरोबर या वर्षाच्या सप्टेंबरपासून याची तुलना केल्यास कंपनीत 52 टक्क्यांची वाढ झाली आहे. सांगायचे म्हणजे की सप्टेंबर 2020 मध्ये कंपनीने एकूण 8116 वाहने विकली.
जपानच्या आघाडीच्या कार निर्माता कंपनीने Toyota Etios च्या 744 युनिट्सची निर्यात केली आहे. जूनपासून सलग पाचव्या महिन्यात कंपनीच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली.