Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ठाण्यात 60 कोटींच्या करचोरी प्रकरणी व्यापाऱ्याला अटक

Trader arrested in Rs 60 crore tax evasion case
, शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2022 (10:53 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एका स्टील कंपनीच्या व्यापाऱ्याला 60 कोटी रुपयांच्या करचोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. हा व्यावसायिक बनावट पावत्यांद्वारे कर चुकवत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईतील वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आयुक्तांनी 10.68 कोटी रुपयांच्या बनावट आयटीसी रॅकेटचा पर्दाफाश केला आणि बुधवारी याच प्रकरणात नवनीत स्टील्सच्या मालकाला अटक केली, असे अधिकाऱ्याने सांगितले.
 
बनावट चालान पावत्यांद्वारे करचोरी
नवनीत स्टील्सच्या मालकाने ITC फर्मच्या सेवांचा वापर करून कथितपणे ₹60 कोटींच्या बनावट पावत्या घेतल्या आणि वापरल्याचा आरोप आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. अधिका-यांनी सांगितले की ही फर्म अॅल्युमिनियम आणि स्टीलच्या कच्च्या आणि तयार मालाचा व्यवसाय करत असे. मात्र, मालकाने विविध बनावट कंपन्यांकडून बनावट आयटीसीचा फायदा घेत त्यांना पासही करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
 
करचुकवेगिरी विरोधी मोहिमेअंतर्गत 11 आरोपींना अटक
अधिकाऱ्यांनी सांगितले की, आरोपीला केंद्रीय वस्तू आणि सेवा कायदा, 2017 च्या तरतुदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी अटक करण्यात आली असून त्याला गुरुवारी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. करचुकवेगिरी विरोधी मोहिमेचा एक भाग म्हणून, नवी मुंबई आयुक्तांना ₹ 425 कोटींची करचोरी आढळून आली आहे, असे विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. यामध्ये त्यांनी सुमारे 20 कोटी रुपयांचा करही वसूल केला आहे. त्याचबरोबर त्यांनी करचोरी प्रकरणात अन्य 11 आरोपींनाही अटक केली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महिलेच्या प्रायव्हेट पार्टमधून स्वॅबचे नमुने घेणाऱ्या आरोपीला 10 वर्षांची शिक्षा, कोर्टाने ठोठावला 10 हजारांचा दंड