Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

एक सप्टेंबरपासून ट्रॅफिक नियम तोडल्यास 10 हजार रुपये दंड

एक सप्टेंबरपासून ट्रॅफिक नियम तोडल्यास 10 हजार रुपये दंड
आपल्यालाही निष्काळजीपणे वाहन चालवायची सवय असेल किंवा सिग्नलला न जुमानता आपण सरेआस गाडी तेथून पळवत असाल तर ही बातमी खास आपल्यासाठी आहे. 
 
नवीन मोटर वाहन संशोधन विधेयक 2019 लोकसभा आणि राज्यसभेत पास झाले असून एक सप्टेंबरपासून प्रभावी होऊ शकतात. सरकाराच्या योजनेप्रमाणे काही प्रावधान लगेच लागू करण्यात येतील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याप्रमाणे मोटर व्हीकल ऍक्ट मध्ये नवीन पेनल्टीमुळे नियमांचे उल्लंघन करणार्‍यांमध्ये भीती निर्माण होईल.
 
गडकरी यांच्याप्रमाणे लोकं कायद्याला मान न देता नियम तोडायला पुढे मागे बघत नाही. पकडले गेलो तरी काही पैसे देऊन फाईन पासून वाचता येईल असे विचार करणार्‍यांसाठी परिस्थिती बदलणार आहे. आता नियम तोडल्यापूर्वी त्यांना विचार करावा लागेल.
 
गडकरी यांनी सांगितले की अनेक गोष्टींचा विचार करून नवीन प्रावधान लागू केले गेले आहे. लवकर रेल्वे सेफ्टी बोर्ड यावर आधारित रोड सेफ्टी बोर्ड तयार करण्यात येईल, ज्यात रस्त्यावरील सुरक्षेसंबंधी सर्व मुद्दे बघितले जातील. सोबतच ब्लॅक स्पॉट शोधून दुरस्ती करण्यात येतील.
 
सूत्रांप्रमाणे नवीन ट्रॅफिक नियम 01 सप्टेंबरपासून लागू होतील. नवीन नियमानुसार दारू पिऊन वाहन चालत असणार्‍यांना दो हजार रुपये ऐवजी आता 10 हजार दंड भोगावा लागणार आहे. तसेच सीट बेल्ट न लावता ड्रायविंग करणार्‍यांना 100 रुपये ऐवजी एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

नवीन यादीप्रमाणे परवाना नसल्यास 5 हजार रुपये, स्पीडिंग रेसिंगसाठी 5 हजार रुपये, दुचाकीवर क्षमतेपेक्षा अधिक वजनासाठी 1 हजार रुपये दंड आणि तीन महिन्यांसाठी परवाना रद्द, इंश्योरेंस नसून ड्रायविंगसाठी दोन हजार रुपये, तसेच अल्पवयीन द्वारे ड्रायविंग करणार्‍याच्या पालकांना, वाहन मालकाला दोषी ठरवण्यात येईल. सोबतच 25 हजार रुपये दंडासह तीन वर्षांची कैद. अल्पवयीनवर जस्टिस जुवेनाइल अॅक्टमध्ये प्रकरण दाखल होईल आणि मोटर व्हीकल रजिस्ट्रेशन रद्द करण्यात येईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

India's Miss TGPC ब्युटी कांटेस्टच्या फायनलमध्ये आरंभी माणके