देशातील UPI पेमेंट सेवा शनिवारी रात्री काही तासांसाठी बंद झाल्याची तक्रार युजर्सने ट्विटरवर केली. UPI सेवा बंद झाल्यामुळे SBI आणि ICICI च्या ग्राहकांना अडचणीला सामोरी जावे लागले. UPI चे सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार युजर्सने ट्विटरवर केल्या. UPI ची सेवा रविवारी सकाळी पूर्ववत सुरु झाली.
सध्या देशात डिझिटल इंडिया मोहीम सुरु आहे. या अंतर्गत UPI सेवा सुरु करण्यात आली आहे. सध्या भाजीवाल्यांपासून ते मोठ्या मोठ्या मॉल पर्यंत हे सेवा वापरण्यात येत आहे. लोकांची सोबत पैसे ठेवण्याची सवय देखील आता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत शनिवारी UPI चे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना अडचणींना समोरी जावे लागले.
शनिवारी अनेक ट्विटर युजर्सनी UPI चे सर्व्हर डाऊन झाल्याची तक्रार केली. पेमेंट केल्यावर युजर्सला 'Banking Gateway down किंवा 'Server Down' असा मेसेज येत होता. रविवारी सकाळी UPI सेवा पूर्ववत सुरु झाल्याचं दिसलं.