Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वालपापडी, टोमॅटोच्या किंमती उच्चांकावर : पुरवठ्यातील टंचाईमुळे दर कडाडले

tamatar
, शनिवार, 8 जुलै 2023 (07:35 IST)
Tomato prices on high पणजी :गोवा राज्यात भाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी गोमंतकीय आजही शेजारील राज्यांमधून येणाऱ्या भाज्यांवरच अवलंबून आहे. त्यामुळे राज्यातील भाज्यांचे दर पुरवठ्यानुसार ठरत असतात. सध्या या पावसामुळे या पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून त्यातून भाज्यांचे दर कडाडले आहेत. यात वालपापडी आणि टोमॅटो यांच्या किंमती आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. वालपापडी 160 ऊपये तर टोमॅटो 140 ते 150 रु पयेपर्यंत विकला जात आहे.
 
देशव्यापी टंचाईमुळे ही परिस्थिती ओढवली असून गगनाला भिडलेले दर नजीकच्या काळात कमी होण्याची शक्यता दिसत नाही, असे पणजी मार्केटमधील एका भाजी विक्रेत्याने सांगितले. या दोन्ही भाज्यांपेक्षा कित्येक पट जास्त आले आणि लसूण यांचे दर पोहोचले आहेत. त्यापैकी आले तब्बल 400 ऊपये तर लसूण 200 ऊपये किलोवर पोहोचली आहे.
 
हिरव्या मिरचीचे दरही बरेच तिखट असून 160 ऊपये प्रतिकिलो तर ढब्बू मिरची 120 ऊपये किलोप्रमाणे विकली जात होती. त्याशिवाय गाजर, बीट, वांगी, कारले यांच्या किंमती प्रत्येकी 80 ऊपये प्रमाणे होत्या, तर फ्लावर 50 ऊपये, ओली कोथंबीर 40 ऊपये किलो दराने उपलब्ध होते.
 
एकेकाळी सोन्याच्या भावात विकला गेलेला कांदा मात्र सध्या 30 ऊपयांवर स्थिर आहे. त्याच्याच बरोबरीने बटाटे, मेथी, शेपू यांच्याही किंमती 30 ऊपयांवर स्थिरावल्या असल्याचे दिसून आले.
 
कमी आवक आणि भरीस पावसामुळे होणारी नासाडी ही भाववाढीची प्रमुख कारणे असल्याचे सदर विक्रेता म्हणाला. सध्याच्या भाज्यांच्या किंमती या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारख्या नसल्याने बाजारात ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. त्याचा परिणाम म्हणून आम्हालाही धंद्यात नुकसानी सहन करावी लागत असल्याचे अन्य एका विक्रेत्याने सांगितले. परंतु आम्ही स्वत: या भाज्यांचे पिक घेत नसल्याने दरांवर नियंत्रण ठेवणे कोणत्याही प्रकारे आमच्या हातात नाही. त्यामुळे भाज्यांचे दर ऐकताच ग्राहकांचे हिरमुसले होणारे चेहरे पाहण्यापलिकडे काहीच करू शकत नाही, असेही तो म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजाराम बंधाऱ्यांसह 6 बंधारे पाण्याखाली, धोकादायक वाहतूक