विप्रोचे संचालक अजीम प्रेमजी यांचा वार्षिक मानधनात गेल्या वर्षीच्या तुलनेत ६३ टक्के घट झाली आहे. कोणत्याही प्रकारचं कमिशन मिळाल नसल्यामुळे मानधनात मोठी घट नोंदवली गेली आहे. प्रेमजी यांचं वार्षिक मानधन यावर्षी १ लाख २१ हजार ८५३ डॉलर अर्थात भारतीय रूपयांप्रमाणे सुमारे ७९ लाख रूपये इतके होते. मागच्या आर्थिक वर्षात प्रेमजी यांचं मानधन ३ लाख २७ हजार ९९३ डॉलर म्हणजेच भारतीय चलनाप्रमाणे २ कोटी १७ लाख रूपये होते. अमेरिकेतल्या विनिमय आयोगानं दिलेल्या माहितीनुसार प्रेमजी यांना २०१६-१७ या वर्षात ६६ हजार ४६४ डॉलर मानधन, ४१ हजार ७४२ रूपये भत्ता आणि १३ हजार६४७ डॉलरचं दीर्घकालीन पॅकेज मिळालं होतं. मात्र ३१ मार्च २०१७ ला जो आर्थिक आढावा घेण्यात आला त्यात प्रेमजी यांचं कमिशन शून्य टक्के होतं.