Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील

भारताचा विकासदर 7.3 टक्के राहील
चालू आर्थिक वर्षात भारतीय विकास दर 7.3 टक्क्यांच्या घरात जाईल, असा अंदाज जागतिक बँकेकडून व्यक्‍त करण्यात आला आहे. जीएसटी करप्रणाली लागू केल्यानंतर झालेल्या परिणामातून आता भारतीय अर्थव्यवस्था आता बाहेर पडत आहे, असा अहवाल जागतिक बँकेने दिल्याने भारताला दिलासा मिळाला आहे.
 
दक्षिण आशियाई देशांच्याबाबत जागतिक बँकेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार दक्षिण आशियामध्ये सर्वात गतीने विकास करणारा देश म्हणून भारताची नोंद करण्यात आली आहे. गत आर्थिक वर्षात (2016-17) भारताचा आर्थिक दर 6.7 होता, आता यामध्ये वाढ होऊन यंदा (2017-18) तो 7.3 टक्के होईल. देशातील आर्थिक सुधारणा आणि गुंतवणूक वाढत असल्याने ही वाढ होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

म्हणे, महाभारताच्या काळात इंटरनेट होते