Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

यवतमाळ : 28 लाखांचे बोगस बीटी बियाणे जप्त

seeds
, मंगळवार, 12 एप्रिल 2022 (08:06 IST)
पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी गावाजवळ पोलिसांनी जवळपास 28 लाख 52 हजारांचे बोगस बीटी बियाणे जप्त केले आहे. पांढरकवडा पोलीस पेट्रोलिंग करीत असतांना बोलेरो (KA 40 A 9994) वाहनाचा संशय आल्याने केली वाहनाची तपासणी
 
पांढरकवडा पोलिस आणि कृषी विभागाची कारवाई कर्नाटक येथून महाराष्ट्र मध्ये येत होते बोगस बीटी बियाणेएकूण 33 लाख 52 हजारांचा मुद्धेमाल जप्तचालक मंजुनाथ रेड्डी ( कर्नाटक) त्याचा साथीदार व्यंकटेशस्वरा आदिनारायन डुग्गुबाती (आंध्रप्रदेश) दोघांना अटक करण्यात आली आहे .
 
पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी पथकासह आदिलाबाद – नागपूर रोडवर गस्त करित असतांना मराठवाकडी गांवाजवळ महिंद्रा पीक अप क्रमांक KA 40 A 9994 हे वाहन खाली प्लॅस्टीकचे प्लॅस्टीकचे कॅरेट घेवुन जात असतांना पोलीस वाहनाला क्राॅस झाले. त्यावेळी सदर वाहनाच्या टायर कडे पोलीसांचे लक्ष गेले असता जास्त वजनामुळे टायर वर प्रेशर आलेला दिसला. परंतू सदर वाहनामध्ये खाली प्लॅस्टीकचे कॅरेट भरलेले होते व त्यांचे वजन कमी असते त्यामुळे टायर वर प्रेशर येण्याची शक्यता नसल्याने सदर वाहनामध्ये नक्कीच काहीतरी वजनदार माल असण्याचा संशय आल्याने पोलीसांनी सदर वाहनाला थांबवले असता सदर वाहनामध्ये काय माल आहे असे विचारले असता वाहन मधील व्यक्ती उडवा-उडवीची उत्तरे देवू लागले. त्यामुळे सदर वाहनाची खाली प्लॅस्टीकचे कॅरेट बाजुला करून झडती केली असता सदर वाहनाच्या मागील पाल्यामध्ये प्लॅस्टीक कॅरेटच्या खाली एकुण 30 प्लॅस्टीकच्या बोरी मिळुन आल्या. त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये प्रतिबंधित असलेली कापसाचे प्रक्रिया केलेले बियाणांचे पॅकेट आढळून आले. त्यामूळे पंचासमक्ष व्यंकटेशराराव डग्गुबाती याला विचारणा केली असता त्याने सदरची सरकी कर्नाटका मधील गौरीबिदनूर जि. चिकबल्लापूर येथील गंगारेड्डी नांवाच्या इसमाकडुन विकत घेतल्याचे सांगितले व त्याच्याकडे त्याबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरचे वाहन पुढील कायदेशिर कारवाई करिता पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे आणण्यात आले सदर वाहनामधील कापसाच्या बियाणांची तपासणी होवून कायदेशिर कारवाई करण्यात आली.  महिंद्रा पीक अप वाहन क्र. K A 40 A 9994 ची पाहणी करून सोबत असलेल्या 2 मजुरांच्या मदतीने वाहनामधील मागील डाल्यामधील एकुण 30 प्लॅस्टीकच्या बोरी व एक ज्युटचे पोते खाली उतरवून त्यांना उघडुन पाहीले असता त्यामध्ये प्रकिया केलेले कापसाचे अनधिकृत बियाणे आढळुन आले. एकुण मिळुन आलेल्या अनधिकृत बियाणाची किंमत 28 लाख 52 हजार 310 रूपये आणि आणि एक चार चाकी गाडी महिंद्रा बोलेरो पीक अप वाहन क्रमांक K A 40 A 9994 अंदाजे किंमत रूपये 5 लाख रुपये आहे वरील प्रमाणे एकुण 33 लाख 52 हजाराचा मुद्देमाल पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे जप्त करण्यात आला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी