टाटा पॉवर या कंपनीच्या उर्जा संरक्षण जागरूकता कार्यक्रमाच्या माध्यमातून तीन वर्षांत दहा लाख युनिट वीज वाचविण्यात यश आले आहे.
कंपनीने तीन वर्षांपूर्वी उर्जा क्लब ही अभिनव कल्पना सुरू केली होती. विजेचा अपव्यय रोखणे हे या क्लबचे उद्दिष्ट होते. देशातील दहा लाख लोकांना आम्ही वीज वाचविण्याची माहिती दिली. त्यामुळ दहा लाख मेगावॉट वीज वाचली, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद मेनन यांनी सांगितले. कंपनीच्या या क्लबची सुरवात मुंबईपासून झाली होती.