Article Marathi Business News %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a5%80%e0%a4%a8%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0 %e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%9c %e0%a4%a6%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a2 109101600007_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दिवाळीनंतर विज दरवाढ

दिवाळीनंतर विज दरवाढ
घरगुती वीज दरवाढीच्या महावितरणच्या प्रस्तावाला राज्य सरकारने दिलेला स्थगनादेश राज्य नियामक आयोगाने ( एमईआरसी) अमान्य केल्यामुळे वीजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील महिन्यापासून सुमारे ७ टक्के वाढीचा फटका ग्राहकांना सोसावा लागण्याची चिन्हे आहेत. घरगुती वापराच्या वीजदरात वाढ आणि मॉल्स, मल्टिप्लेक्सच्या वीजदरातील घट यास विरोध करीत ऐननिवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ पावले उचलत वीज कायद्यातील कलम १०८ चा वापर करून वीज दरवाढीस स्थगिती देण्याचा आणि सबसिडीविषयी मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्याचा आदेश आयोगास दिला होता. सरकारचा हा आदेश आयोगाच्या संकेतस्थळावर टाकण्यात आला; मात्र त्याबाबतची स्वतःची भूमिका मात्र आयोगाने स्पष्ट केली नव्हती.

Share this Story:

Follow Webdunia marathi