Article Marathi Business News %e0%a4%a8%e0%a5%85%e0%a4%a8%e0%a5%8b %e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8 %e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0 %e0%a4%91%e0%a4%ab %e0%a4%a6 %e0%a4%87%e0%a4%af%e0%a4%b0 109122100053_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नॅनो 'इंडियन कार ऑफ द इयर'

नॅनो इंडियन कार ऑफ द इयर
WD
WD
टाटा मोटर्सच्या नॅनोची प्रसिद्धी जगभर झाली आहे. नॅनोचे आकर्षण इतके वाढले आहे, की अमेरिकेतील संग्रहालयातही तिचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. यातच आता दिग्गज कंपन्यांच्या उत्पादनांना पछाडत नॅनोने 'इंडियन कार ऑफ इयर' होण्याचा मान पटकावला आहे.

दुचाकी गाड्यांमध्ये बजाजच्या कावासाकी निंजा 250 आरने इंडियन मोटर सायकल ऑफ इयरचा मान पटकावला आहे. अडीच लाख किमतीच्या या गाडीचेही नॅनो प्रमाणेच आकर्षण आहे.

कार ऑफ द इयरच्या शर्यतीत शेवरलेट क्रुज, होंडा जॅज, फिएट लीनिया, मारुती रिटज, महिंद्रा झायलो, स्कोडा सुपर्ब, टाटा इंडिगो मांजा, आणि नॅनोचा समावेश होता. या स्पर्धेत नॅनोला 63 गुण तर, या पाठोपाठ स्कोडा सुपर्बला 53 गुण मिळाले. 33 गुण पटकावत
होंडा जॅज तिसऱ्या क्रमांकावर आली.

जे के टायरतर्फे हे पुरस्कार दिले जातात. नॅनोची प्रसिद्धी वाढत असल्याचे या प्रसंगी टाटा मोटर्सचे प्रबंध संचालक प्रकाश एम तेलंग यांनी स्पष्ट केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi