Publish Date: Fri, 04 Dec 2009 (10:54 IST)
Updated Date: Fri, 04 Dec 2009 (10:54 IST)
कर्नाटक सरकारने राजधानी बंगळुरुत जपानी गाव वसवण्याची तयारी सुरू केली आहे. जपानी कंपन्यांचे हे औद्योगिक पार्क असणार आहे.
औद्योगिक विकास आयुक्त आणि उद्योग, वाणिज्य संचालक राज कुमार खत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार जपानी कंपन्यांनी औद्योगिक पार्क उभारण्याची विनंती सरकारकडे केली होती. सरकारने याला मंजुरी दिली आहे.
जपानी कंपन्यांनी यासाठी राज्यात जमीन मागितली असून, त्यांच्या या प्रस्तावावर विचार करण्यासाठी औद्योगिक सचिव एस व्ही रंगनाथ यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली असून, 10 तारखेला याची बैठक होत असल्याचे खत्री यांनी स्पष्ट केले.