Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतात उपलब्ध 10 सर्वात महाग कार

भारतात उपलब्ध 10 सर्वात महाग कार
जीवनात वेग सर्वांना आवडतो. आणि वेगाचे शौकिन लोकांसाठी वेगाने धावणार्‍या गाड्यांची माहिती गोळा करणे ही एक छंद असतो. तर आज आम्ही तुम्हाला अश्या काही वेगवान आणि महागड्या गाड्यांबद्दल माहिती देणार आहे. तर आपण अश्या गाड्या घेणार असो वा नसो त्या बघून मन प्रसन्न तर नक्कीच होईल.

10. ऑडी आर8 एलएमएक्स (Audi R8 LMX)
किंमत: 2.97 कोटी रुपये


 
या कारमध्ये 5.2 लीटरचे V10 इंजिन लागलेले आहे. 0-100 किमी प्रति तासाची स्पीड पकडायला या कारला मात्र 3.4 सेकंद लागतात.

9. पोर्श 911 टर्बो एस (Porsche 911 Turbo S)
किंमत: 2.8 - 3 कोटी रुपये

webdunia

 
या यादीत ही एकमेव जर्मन कार आहे. या कारमध्ये 3.8 लीटर पेट्रोल इंजिन लागलेले आहे. कारची टॉप स्पीड 318 किलोमीटर प्रति तास आहे. 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड पकडायला या कारला मात्र 3.1 सेकंद लागतात.

8. फेरारी कॅलिफोर्निया (Ferrari California)
किंमत: 3-5 कोटी रुपये

webdunia

 
या इटालियन कारमध्ये V8 इंजिन लागलेले आहे. फरारीच्या या गाडीची टॉप स्पीड 320 किलोमीटर प्रति तास आहे जेव्हाकी ही कार 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड मात्र 3.4 सेकंदात घेते.

7. बेंटली फ्लाइंग स्पर (Bentley Flying Spur)
किंमत: 3.2 कोटी रुपये

webdunia

 
ही कार दो इंजिन ऑप्शन V8 आणि W12 सह बाजारात उपलब्ध आहे. V8 इंजिन 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड 5.2 सेकंदात पकडते आणि W12 इंजिन 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड घेण्यात मात्र 4.6 सेकंद घेते. V8 इंजिनाची टॉप स्पीड 295 किलोमीटर प्रति तास आहे आणि W12 ची टॉप स्पीड 320 किलोमीटर प्रति तास आहे.

6. ऍस्टन मार्टीन वैंकिश (Aston Martin Vanquish)
किंमत: 3.8 कोटी रुपये

webdunia

 
ब्रिटिश कंपनीची आणखी एक कार या यादीत सामील आहे. या कारमध्ये 6.0 लीटर V12 इंजिन लागलेले आहे. ही कार 4.2 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड धरते. याची टॉप स्पीड 295 किलोमीटर प्रति तास आहे. 

5. रोल्स रॉयस रैथ (Rolls Royce Wraith)
किंमत: 4.6 कोटी रुपये

webdunia

 
या यादीत Rolls-Royce ची आणखी एक कार आहे. Wraith यात 6.6 लीटर V12 इंजिन लागलेले आहे. ही कार मात्र 4.6 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड पकडते. याची टॉप स्पीड 250 किलोमीटर प्रति तास आहे.

4. लम्बोर्घिनी अवेंटेडर (Lamborghini Aventador)
किंमत: 5.36 कोटी रुपये

webdunia

 
मात्र 3 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड घेणार्‍या या कारमध्ये V12 इंजिन लागलेले आहे. यात 7-स्पीड ऑटोमॅटिक गियरबॉक्स लागले आहे. या गाडीची टॉप स्पीड 350 किलोमीटर प्रति तास आहे.

3. बेंटली मलसेन (Bentley Mullsane)
किंमत: 7.5 कोटी रुपये

webdunia

 
या कारमध्ये 6.75 लीटर ट्विन टर्बोचार्जड V8 इंजिन लागले आहे. ही कार मात्र 5.3 सेकंदात 100 किलोमीटर प्रति तासाची स्पीड पकडून घेते. या गाडीची टॉप स्पीड 296 किलोमीटर प्रति तास आहे.

2. रोल्स रॉयस फैंटम सीरीज II (Rolls-Royce Phantom Series II)
किंमत: 8-9 कोटी रुपये

webdunia

 
रोल्स रॉयसची ही शानदार कारची अधिकतम स्पीड 240 प्रति तास आहे. 0-100 किमी प्रति तास स्पीडसाठी ह्या कारला फक्त 5.9 सेकंद लागतात.

1. बुगाटी वेरॉन ग्रैंड स्पोर्ट्स (Bugatti Veyron Grand Sports)
किंमत: 38 कोटी रुपये

webdunia

 
ही आहे भारतातील सर्वात महाग कार. आणि का नसणार कारण ही आहे सर्वात वेगवान कार. ह्या कारची टॉप स्पीड 408 किमी प्रति तास आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi