Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मच्छर पळवणारा TV आला, जाणून घ्या त्याची किंमत...

मच्छर पळवणारा TV आला, जाणून घ्या त्याची किंमत...
, बुधवार, 8 जून 2016 (13:48 IST)
गर्मी आणि पावसाच्या दिवसांमध्ये डास घरात येणे फारच सामान्य गोष्ट आहे. याचा सर्वात मोठा धोका मलेरिया, डेंगू आणि चिकनगुनिया सारखे भयंकर आजार आहे. पण आता मच्छरांना पवळण्याची स्मार्ट पद्धत बाजारात आली आहे. तुम्हाला फक्त आपला टीव्ही विकून LGचा नवीन टीव्ही घेऊन यायचा आहे. हे, खरंच आहे. कोरियाची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी LG तुमच्यासाठी एक असा टीव्ही घेऊन आली आहे जो डास पवळण्यात देखील सक्षम आहे. एलजी इलेक्ट्रॉनिक्सने एका विधानात सांगितले की एलजी मॉस्किटो अवे टीव्ही भारतीय ग्राहकांना लक्षात ठेवून विकसीत करण्यात आला आहे.   
 
यात एक अल्ट्रा सॉनिक प्रणाली लागली आहे जी एकवेळा सुरू झाल्यानंतर मच्छरांना दूर ठेवते. यात ध्वनी तरंग तंत्राचा वापर करण्यात आले आहे ज्यामुळे कुठलेही हानिकारक रेडिएशनच्या उत्सर्जन बगैर मच्छर दूर पळून जातात.
 
कंपनीचा दावा आहे की ही तकनीक वैश्विक संंगठनाच्या नियमांच्या अनुरूप आहे. याची चौकशी भारताच्या आंतरराष्ट्रीय जैव प्रौद्योगिकी आणि विज्ञान संस्थानामध्ये करण्यात आले आहे. कंपनीने सांगितले की या प्रौद्योगिकीत कुठलेही हानिकारक रसायन किंवा विषाचा प्रयोग करण्यात आलेला नाही आहे आणि दुसर्‍यांदा भरण्याची गरज देखील नसते. त्याशिवाय या मच्छर पळवणार्‍या तंत्राचा वापर करण्यासाठी टीव्ही सतत सुरू ठेवणेही गरजेचे नाही आहे. इंडियन मार्केटमध्ये याचे 80सीमी वाले वेरियंटची किंमत ऐकून 26,900 रुपये आहे, तसेच 180 सीमी असणार्‍या टीव्हीसाठी तुम्हाला 47, 500 रुपये मोजावे लागणार आहे.   

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेव्हा मैदानात घायाळ झाला अन रडू लागला विराट कोहली...