मुंबई- बँकेचे आवश्यक काम आटपण्यासाठी शुक्रवारचा दिवस शेवटला आहे म्हणायला हरकत नाही कारण यानंतर पाच दिवस बँकेना सुट्टी राहील. फेस्टिवल सीझन म्हणून हा आठवडा काही जास्तच लांब खेचला जाणार आहे.
महिन्याचा दुसरा शनिवार म्हणून 8 ऑक्टोबरला बँका बंद राहतील. रविवारी सामान्य अवकाश, 10 तारखेला महानवमी म्हणून अनेक राज्यांमध्ये अवकाश राहील. 11 ऑक्टोबरला विजयादशमीची तर 12 ऑक्टोबरला मोहर्रम असल्याने बँकेत कामकाज बंद राहील.
फेस्टिवल सीझनमुळे लोकांना 'एटीएम'मधून पैसे काढण्यासाठी समस्या झेलाव्या लागू शकतात. सुट्टयांमुळे एटीएममध्ये पैसे संपल्यावरही बँका यात रोखची पुनरापूर्ती करू शकणार नाही. तसेच कॅशलेस भुगतानासाठी इतर विभिन्न पर्याय व इंटरनेट बँकिंगमुळे काही प्रमाणात समस्या सुटतील.