लासलगाव बाजार समितीमध्ये आलेल्या लाल कांद्यालाही भाव मिळत नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. याआधी जुलै, ऑगस्टमध्येही अशीच परिस्थिती होती. आता सप्टेंबरमध्येही तीच परिस्थिती बघायला मिळत आहे. त्यामुळे आता शेतकर्यांनी शेती करावी की, नाही असा प्रश्न शेतकर्यांपुढे निर्माण झाला आहे. सध्या १०० ते २०० रुपयांना प्रतिक्विंटल कांदा जात आहे. त्यामुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान आहे. लाल कांद्याची आवक सुरू झाली, की चित्र बदलेले अशी अपेक्षा होती. मात्र लाल कांद्यालाही कमीच भाव मिळत आहे. नैताळे येथील गोविंद घायाळ यांच्या लाल कांद्याला केवळ १७१ रुपये भाव देण्यात आल्यामुळे कांदा न विकता ते तसाच घरी घेऊन गेले.