Publish Date: Tue, 01 Dec 2009 (10:29 IST)
Updated Date: Tue, 01 Dec 2009 (10:28 IST)
चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीत आर्थिक विकास दर 7.9 टक्क्यांवर आल्याने रिझर्व्ह बँकेनेही आश्चर्य व्यक्त करत भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही 'गुड न्यूज' असल्याचे म्हटले आहे. बँकेने यापूर्वी विकास दर सहा ते सात टक्क्यांदरम्यान राहील असा विश्वास व्यक्त केला होता.
अर्थ मंत्रालयातील रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गर्व्हनर सुबीर गोकर्ण यांनी दिलेल्या माहितीनुसार विकास दराने सातच्या पुढे मजल मारल्याने बँकेने आनंद व्यक्त केला असून, यापुढील काळातील विकास दराचा अंदाज वाढवण्यात आला आहे.
आगामी काळातील विकास दराचा अंदाज सांगण्यास त्यांनी नकार दिला. देशातील अनेक अर्थतज्ज्ञांनीही याविषयी आनंद व्यक्त केला आहे.