Publish Date: Wed, 23 Dec 2009 (11:21 IST)Updated Date: Wed, 23 Dec 2009 (11:21 IST)
WD
WD
पुढील वर्षात देशातील साखरेचे उत्पादन दोन कोटी 30 लाख टनवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साखरेच्या उत्पादना विषयी दररोज एक शक्यता व्यक्त केली जात असून, साखर उत्पादक संघ इस्माने साखर आयात करावी लागण्याची शक्यता मंगळवारी व्यक्त केली होती.
राष्ट्रीय साखर कारखाना सहकारी महासंघ लिमिटेड चे प्रबंध संचालक विनय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार 2010 च्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणाऱ्या वर्षानुसार साखरेचे उत्पादन दोन कोटी 30 लाख टन होण्याची शक्यता आहे.