Publish Date: Sun, 06 Dec 2009 (09:36 IST)Updated Date: Sun, 06 Dec 2009 (09:35 IST)
ND
ND
अमेरिकेत रोजगाराच्या संधी वाढल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात धातूच्या किंमतींमध्ये घसरल्याने राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात सोने 18 हजारांखाली आले आहे. मागील आठवड्यात सोन्याने 18, 460 रुपयांचा पल्ला गाठल्यानंतर सोने 19 हजारांवर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती.
बाजारात सोने 590 रुपयांनी घसरत 17760 रुपये प्रती दहा ग्रॅमवर तर चांदी 250 रुपयांनी घसरत 29200 रुपये प्रती किलोवर आली आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची किंमतींत घसरण दिसून आली. लंडनमध्ये सोने 1167.65 डॉलर प्रती औंसपर्यंत घसरले होते. न्यूयॉर्क बाजारात 1207.10 डॉलर प्रती औंसवर सोने आले आहे.
मागील आठवड्यात सोने 18,460 रुपयांवर गेल्यानंतर नवीन आठवड्यात सोने नवीन उच्चांक गाठणार असल्याचे बोलले जात होते.