महागाई दरात होणारी वाढ, डॉलरचे मूल्य सातत्याने घसरत असल्याने सोन्यातील गुंतवणूक वाढली आहे. याचाच परिणाम म्हणून 17 हजारी झालेल्या सोन्याने आता 18 हजारांकडे वाटचाल केली असून, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1160 डॉलर प्रती औंसवर पोहचले आहेत.
आतापर्यंत चालू वर्षात धातूंच्या दरात विक्रमी 32 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतानेही आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून 200 टन सोने विकत घेतल्याने देशातील सोन्याची विक्रीही अचानक वाढली आहे.
गुंतवणूकदारांचा ओढा सोन्याकडे वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोने 14.65 डॉलर प्रती औंसने वाढत 1162.85 डॉलर प्रती औंसवर गेले.
आगामी काळातही डॉलरच्या दरात मोठ्या प्रमाणावर घसरण होण्याची शक्यता असल्याने सोने आणखी वधारण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.