rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Christmas 2025 Wishes In Marathi नाताळच्या शुभेच्छा

ख्रिसमसच्या शुभेच्छा कशा द्याव्यात?
, गुरूवार, 25 डिसेंबर 2025 (08:47 IST)
हा नाताळ सण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना आनंद, शांती आणि समृद्धी आणो! 
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा! 
 
नाताळ सण घेऊन आला मोठा आनंद,
सर्वत्र होवो दे सुख-समृद्धीची बरसात...
जगात मानवता हाच धर्म खास,
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

हा नाताळ आपल्या मनात आणि घरात आनंद आणो,
प्रेम आणि शांततेचा प्रकाश सर्वत्र पसरवो.
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 
सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्तता, यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य हे आपल्याला मिळो दे...
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रभू येशूचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो,
सुख, शांती आणि प्रेमाने तुमचे जीवन भरून जावो.
मेरी ख्रिसमस आणि नाताळच्या शुभेच्छा!

या नाताळच्या सणात सांता क्लॉज तुमच्या दारी आनंद आणि समृद्धी घेऊन येवो.
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!
 
स्नेहाचा सुगंध दरवळला, आनंदाचा सण आला,
विनंती आमची येशूला, सौख्य-समृद्धी लाभो तुम्हाला!
नाताळच्या हार्दिक शुभेच्छा!
 
प्रभू येशूची कृपा तुमच्यावर नेहमी राहो,
जीवनात प्रेम, सुख आणि शांती नांदो.
नाताळच्या मनापासून शुभेच्छा!
 
या नाताळच्या दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत,
सांता क्लॉज आनंद आणि यश घेऊन येवो.
मेरी ख्रिसमस आणि हार्दिक शुभेच्छा!
 
नाताळचा सण सुखाची उधळण करो,
प्रेम आणि शांततेचा प्रकाश सर्वत्र पसरवो.
नाताळच्या खूप खूप शुभेच्छा!
 
भगवान येशूचा आशीर्वाद तुम्हाला मिळो,
तुमचे घर आनंदाने आणि समृद्धीने भरून जावो.
नाताळ सणाच्या हार्दिक शुभेच्छा!

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Tallest Christmas Tree जगातील सर्वात उंच ख्रिसमस ट्री कुठे आहे? माहित आहे का तुम्हाला?