Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 8 March 2025
webdunia

येशू ख्रिस्त यांना सुळावर का चढविण्यात आले, जाणून घ्या

येशू ख्रिस्त यांना सुळावर का चढविण्यात आले, जाणून घ्या
, शुक्रवार, 2 एप्रिल 2021 (17:26 IST)
ख्रिस्ती धर्माला ख्रिश्चन धर्म असे ही म्हणतात. या धर्माचे संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त असल्याचे मानतात. यांना परंपराचा संदेश देणारा मानला जातो. इब्रानी भाषेत त्यांना येशू किंवा येशुआ म्हणतात पण इंग्रजी मध्ये जेशुआचे अपभ्रंश होऊन जिझस झाले. जाणून घेऊ या की त्यांना वधस्तंभावर का चढविण्यात आले. 
 
25 डिसेंबर सन 6 रोजी येशू यांचा जन्म एका सुताराच्या बायकोच्या मॅरिअम (मेरी) च्या पोटी बेथलेहेम येथे झाला. असे म्हणतात की ज्यावेळी येशूंचा जन्म झाला तेव्हा मॅरिअम कुमारिका असे. मॅरिअम ही जोसेफ यांची धर्माची बायको होती. बेथलेहेम हे इस्राईल मध्ये येरुशेलम पासून 10 किमी दक्षिणेस वसलेले एक फिलीस्तीनी शहर आहे. ज्या दिवशी येशूंचा जन्म झाला त्या दिवसाला मेरी ख्रिसमस असे म्हणतात. रविवारी येरुशेलम मध्ये येशूंनी शिरकाव केला या दिवसाला 'पाम संडे' म्हणतात. शुक्रवारी त्यांना सुळावर टांगण्यात आले म्हणून या दिवसाला 'गुड फ्रायडे' असे म्हणतात आणि रविवारीच त्यांना एका स्त्रीने (मेरी मेद्गलीन) ने त्यांच्या कबरी जवळ जिवंत बघितले. जिवंत बघितलेच्या घटनेला 'ईस्टर' म्हणून साजरे करतात. असे म्हणतात की त्यानंतर येशू कधीही यहुदींच्या राज्यात दिसले नाही.  
 
प्रारंभ - एका सुताराची बायको मॅरिअम (मेरी) यांच्या पोटी येशूचा जन्म बेथलेहेम येथे झाला. येशू जेव्हा 12 वर्षाचे झाले त्यांनी यरुशेलम मध्ये 2 दिवस राहून पुजाऱ्यांशी ज्ञानाच्या विषयी चर्चा केली. वयाच्या 13 व्या वर्षी ते कुठे गेले काहीच कळले नाही. 13 ते 30 वर्षाच्या दरम्यान काय केले हे गूढच आहे. बायबल मध्ये देखील त्यांच्या या वर्षांचा काहीच उल्लेख नाही. 30 व्या वर्षी त्यांनी येरुशेलम मध्ये युहन्ना (जॉन) कडून शिकवणी घेतली. नंतर त्यांनी लोकांना ज्ञान देण्यास सुरुवात केली. बहुतेक विद्वानांच्या मते, 29 एडी रोजी, प्रभू येशू गाढवावर येरुशेलम आले आणि त्यांना तिथेच शिक्षा देण्याचा कट रचला गेला. त्यांच्या विरोधकांनी त्यांना धरून सुळावर चढविले त्या वेळी त्यांचे वय अवघे 33 वर्षाचे होते. या घटनांच्या तीन दिवसानंतर देखील त्यांना मेरी मेद्गलीन हिने एका गुहेजवळ जिवंत बघितले. त्यानंतर येशू कधीही दिसले नाही. 
 
आता प्रश्न असा आहे की अखेर येशूंना सुळावर का चढविण्यात आले?
पहिले कारण - असे म्हणतात की लोकांमध्ये लोकप्रिय असलेले येशू ख्रिस्त यांनी काही भविष्यवाणी केली, ज्यामुळे यहुदी लोकांमध्ये रोष झाला त्यावेळी भविष्य सांगणारे बरेच लोक होते. भविष्य सांगणे म्हणजे स्वतःला देवाचा संदेष्टा किंवा देवदूत सांगणे. असे म्हणतात की यहुदी कट्टर पंथी लोकांना येशूंना स्वतःला देवाचा दूत सांगणे आवडले नाही. इथे रोमन लोकांना यहुदी क्रांतीची भीती वाटत होती कारण त्यांनी यहुदी राज्यावर आपले आधिपत्य गाजवले होते. म्हणून रोमन लोकांचे राज्यपाल पितालूसने यहुदींची ही मागणी मान्य केली की येशूला वधस्तंभावर चढविण्यात यावे.
 
दुसरे कारण- एक सिंद्धात असे सांगतो की येशूच्या बुक ओल्ड टेस्टामेन्ट अनुसार, येशू जेव्हा गाढवावर बसून येतात तेव्हा लोक त्यांचे स्वागत खजुराच्या फांद्या उचलून करतात. त्यांची समज अशी होती की हे इज्राईलच्या सर्व शत्रूंचा पराभव करतील. नंतर येशू टेम्पल माउंटकडे बघतात की त्या टेम्पलच्या गाभाऱ्यात बाहेरच्या बाजूस रोमन टॅक्स कलेक्टर बसलेले आहे, मनी चेंजर्स बसले आहे आणि तिथे सर्व प्रकारचे व्यवसाय सुरू आहे. हे बघून येशूंना खूप वाईट वाटले की या पवित्र मंदिरात अशा प्रकारचे काम चालले आहे. ते कंबरबंध काढून सर्वाना मारून मारून त्यांना काढून देतात तर नंतर जेव्हा रोमन राज्यपालला हे कळले तेव्हा त्यांनी शिक्षा देण्याचा निर्णय घेतला आणि येशूंना सुळावर टांगण्याची घोषणा केली. लक्षात घेण्यासारखे आहे की इस्राईल एक यहुदी राज्य आहे आणि येरुशेलम त्याची राजधानी आहे. जी रोमन लोकांनी काबीज केली जसे इंग्रेजांनी इतर देशांवर आपले काबीज केले होते. पण सत्य काय आहे हे माहीतच नाही. वरील गोष्टी आख्यायिकांवर आधारित आहे. पण या मुळे हे सिद्ध होत की येशू ख्रिस्त यांच्या वर यहुदी रागवले होते तसेच रोमन देखील रागवले होते. यहुदी लोकांची शिक्षा देण्याची स्वतःची पद्धत असते आणि ते आपल्या शत्रुंना स्वतःच शिक्षा द्यायचे. बहुदा ही शिक्षा ते संगासार म्हणून करायचे. 
 
25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा वाढदिवस असतो का?
अलीकडेच बीबीसी वर एका अहवालानुसार येशू यांचा जन्म कधी झाला, त्याला घेऊन एकमत नाही. काही धर्मशास्त्रज्ञाचं मत असे आहे की त्यांचे जन्म वसंत ऋतूत झाला असावा. कारण असा उल्लेख आहे की जेव्हा येशूचा जन्म झाला तेव्हा मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरत होते. जर डिसेंबरचा थंडीचा काळ असता तर ते कुठे तरी त्यांना घेऊन बसले असते. किंवा मेंढपाळ मैथुन करीत असलेल्या मेंढ्यांना कळपापासून वेगळे करण्यात लागलेले असावेत. असं असतं तर तो शरद ऋतूचा काळ असावा. परंतु बायबल मध्ये येशूच्या जन्माचे कोणत्याही दिवसाचे उल्लेख नाही. इतिहासकारांच्या मते रोमन काळात डिसेंबरच्या अखेरीस मूर्तिपूजक परंपरा म्हणून जोरदार पार्टी किंवा समारंभ करण्याची पद्धत अवलंबवली. हीच पद्धत ख्रिश्चनांनी अवलंबवली आणि त्याला नाव दिले 'ख्रिसमस'.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रंगपंचमीला भांगेचा नशा उतरवण्यासाठी घरगुती उपाय