Article Marathi Christmas %e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b3%e0%a5%87 %e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4 %e0%a4%89%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9 111122400002_1.htm

suvichar

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ख्रिसमसमुळे बाजारात उत्साह

ख्रिसम सांताक्लाज ग्रीटिंग व गिफ्ट
ND
ख्रिसमसची सर्वत्र उत्साह वाढत असून बाजारात खरेदीला वेग आला आहे. ख्रिश्चन बांधवाचा हा हषोल्हासाचा सण असल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. गिरिजाघर विद्युत रोषणाईने न्हाऊन निघाले आहेत तर इतरांपेक्षा आपले घर वेगळे कसे दिसेल म्हणून महिला, मुले घरांची सजावटीमध्ये व्यस्त आहेत. ख्रिसमसनिमित्त आकर्षक ग्रीटिंग व क्रिसमस गिफ्ट बाजारात उपलब्ध झाले आहेत.

सांताक्लाज-
ख्रिसमस सणामध्ये सांताक्लाजला खूप महत्त्वाचे स्थान असते. सांताक्लाज आपल्या घरी यावा, अशी प्रत्येकाची मनीषा असते. यंदा गिफ्ट निर्मात्या कंपन्यांनी गिफ्ट रूपात सांताक्लाज बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. चीनी माती मग आकर्षक स्वरूपात तयार करण्यात आला आहे. त्याच्या हॅन्डलवर सांताक्लाजच्या डोके लावले आहे. उर्वरित ठिकाणी सांताक्लाज व क्रिसमस ट्रीज तयार करण्‍यात आल्या आहेत.

आकर्षक ग्रीटिंग व गिफ्ट-
सेलिब्रेशन कोणतेही असो त्यात ग्रीटिंगज् ने आपले स्थान कायम ठेवलेले असते. आपल्या सहकारी, नातेवाईन यांना भेट वस्तू व आकर्षक ग्री‍टिंग देऊन सणाचा आनंद द्विगुणीत केला जात असतो. ख्रिसमस सणामध्ये ही याचे महत्त्व आहे. आकर्षक ग्रीटिंग मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाले आहे. म्युझिकल ग्रीटिंग कार्ड यंदाचे खास आकर्षण ठरले आहे. यांची किंमत 10 पासून ते 160 रुपये आहे.

बाजारात आलेल्या आकर्षक सांताक्लाज लहान मुर्तींनी लक्ष वेधले आहे. त्यासोबत ख्रिसमस ट्री, फ्रेम तसेच विविध गिफ्ट आर्टिकल्स बाजारात दाखल झाले आहे.

webdunia
ND
ख्रिसमस कॅप व रंगीबिरंगी कॅन्डल्स-
ख्रिसमसमध्ये 'ख्रिसमस कॅप'चे विशेष महत्त्व आहे. लहान मुलांमध्ये तिची क्रेज अधिक असते. स्पेशल सेंटा कॅप बाजारात उपलब्ध झाली आहे. मुख्यतः ही लाल रंगाची असते. त्याची किंमत 70 ते 100 रुपयांपर्यंत आहे. त्याचप्रमाणे प्रभू येशू यांचा जन्मोत्सव साजरा करण्‍यासाठी रंगबिरंगी व आकर्षक डिझाईनमध्ये कॅन्डल्स बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यांचा आपण घरात शो पीस म्हणून ही वापर करू शकतो.

चॉकलेट व परफ्यूम-
ग्राहकांची पसंती व त्यांची मागणी लक्षात घेऊन परफ्यूमची मालिका व आकर्षक पॅकिंगमध्ये चॉकलेट्स बाजारात उपलब्ध आहेत.

ड्रेस -
ख्रिसमस सणासाठी बाजारात दाखल झालेले फ्राक व नाईट गाऊन्स महिलावर्गाचे लक्ष वेधत आहे. स्कीन टच गाऊन व फेदर फ्रॉकला खास डिमांड आहे. याशिवाय बुटीक असलेले नवीन कॅटलॉग आले आहेत. फ्रॉक व गाऊन पाचशे रूपयांपासून पाच हजार रूपयांच्या रेंजमध्ये आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi