Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजय-अतुलचा ‘डॉल्बीवाल्या’

अजय-अतुलचा ‘डॉल्बीवाल्या’
अजय-अतुल यांचे संगीत असलेल्या ‘जाऊद्यांना बाळासाहेब’च्या पहिल्या ‘डॉल्बीवाल्या’ गाण्याचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. 
 
गिरीश कुलकर्णीचे ताकदीचे लेखन, गिरीशच्याच तीक्ष्ण नजरेतून झालेले काटेकोर दिग्दर्शन आणि चित्रपटातील प्रमुख भूमिका त्याशिवाय गिरीश बरोबर ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, रिमा, दिलीप प्रभावळकर, सई ताम्हणकर, मनवा नाईक, पूर्वा पवार, नंदकिशोर चौगुले, श्रीकांत यादव, सविता प्रभुणे, भाऊ कदम, स्पृहा जोशी अशी सरस आणि अनुभवी कलाकारांची ङ्खौज या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे एक खास आकर्षण म्हणजे अजय-अतुल या आघाडीच्या आणि दिग्गज संगीतकारांच्या हातात चित्रपटाचे संगीत आहे. 
 
निर्माते म्हणूनदेखील या चित्रपटातून अजय-अतुल हे जोरदार आगमन करत आहेत. अजय-अतुल यांच्यासह ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’या चित्रपटाची निर्मिती केलेल्या पूनम शेंडे, अनुमती, पोस्टकार्ड, हाय-वे चित्रपटाची निर्मिती केलेले विनय गानू, ‘वळू’ आणि ‘गाभ्रीचा पाऊस’चे निर्माते प्रशांत पेठे आणि उमेश कुलकर्णी असे मराठीतले मोठे निर्माते या चित्रपटाशी जोडले गेले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘पद्मावती’त दीपिकासोबत हृतिक?