Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कॉमेडीकिंग कपिल मराठीत झळकणार

कॉमेडीकिंग कपिल मराठीत झळकणार
पुणे , बुधवार, 23 सप्टेंबर 2015 (11:32 IST)
कॉमेडीकिंग कपिल शर्माने  हिंदी चित्रपटात पदार्पण केल्यानंतर लवकरच तो मराठीतही झळकणार आहे. मराठी चित्रपटात काम करणार असल्याचे त्याने पुण्यात पत्रकारांशी बोलताना सांगितले.
 
तो म्हणाला, मी लवकरच मराठी चित्रपटाची केवळ निर्मिती करणार नाही तर त्या चित्रपटात अभिनयदेखील करणार आहे. अनेक मराठी कलाकार आणि तंत्रज्ञ यांच्याबरोबर काम करण्याचा अनेक वेळा योग येतो. त्यांच्याबरोबर मी मला जमेल तसे मराठीत बोलतो. ‘किस किस को प्यार करू’ या चित्रपटात माज्याबरोबर दोन मराठी अभिनेत्री आहेत. सई लोकूर व मंजिरी फडणीस यांच्याबरोबर मी शूटिंगदरम्यान मराठीत बोलायचो. सई लोकूरने मला मराठीचे धडे दिले, असे तो म्हणाला.

Share this Story:

Follow Webdunia marathi